Ad will apear here
Next
भारतीय रेल्वेकडून तिघींना प्रथम पुरस्कार जाहीर


पुणे :
मध्य प्रदेशातील ऐतिहासिक ग्वाल्हेर शहराच्या रेल्वे स्थानकाचा आराखडा बनवण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) तीन विद्यार्थिनीनी प्रथम पुरस्कार पटकावला आहे. ‘बीएनसीए’मध्ये वास्तूरचनाशास्त्राच्या चौथ्या वर्षात शिकत असणार्‍या या विद्यार्थिनींची नावे संजना शिंदे, अलोका काळे आणि सायली गंगण अशी असून, त्यांना यासाठी ८० हजार रुपयांचे बक्षीस भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर नुकतेच जाहीर झाले. ​​

राष्ट्रीय पातळीवरील ग्वाल्हेर रेल्वेस्थानक डिझाइन स्पर्धेत देशभरातून आर्किटेक्ट व्यावसायिक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत ५७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. ‘बीएनसीए’च्या या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, प्राध्यापक वैशाली अनगळ, महेश बांगड, शार्वेय धोंगडे तसेच आर्किटेक्ट चैतन्य पेशवे आणि सोनाली माळवणकर यांनी मार्गदर्शन केले.

‘ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाचा नवीन आराखडा शहराच्या ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाशी मेळ साधणारा असावा हे आव्हान आमच्या पुढे होते. या स्थानकाचा नवा आराखडा तयार करताना तेथील जुन्या व नवीन वास्तू, तसेच उत्पन्न मिळवून देणार्‍या व्यापारी इमारती, याशिवाय तेथील रहदारीचा प्रश्‍न आणि पादचार्‍यांसाठी वेगळी व्यवस्था करून देताना आम्ही अनेक व्यवहार्य, तसेच तेथील सौंदर्य खुलवणारे बदल सुचवले,’ असे संजना शिंदे हिने सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMBBN
Similar Posts
बांधकाम क्षेत्रातील पहिल्या रोबोटिक आकृतिबंधाचे सादरीकरण पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) सहा विद्यार्थिनींसह देशभरातील २० विद्यार्थ्यांनी रोबोटच्या मदतीने तयार केलेल्या पहिल्या आकृतीबंधाचे सादरीकरण केले. ‘बीएनसीए’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील वास्तूरचनाशास्त्र, तसेच बांधकाम व्यवसायाला हा आकृतीबंध समर्पित करण्यात आला
‘मानव व वन्यप्राणी यांचे सहअस्तित्व मान्य’ पुणे : ‘एकीकडे वाढती लोकसंख्या असतानाही भारतात वन्यजीवनात भरपूर विविधता टिकून आहे. पण त्यामुळे मानव व वन्यप्राणी यांच्यात अनेक ठिकाणी अडचणींचे व संघर्षाचे प्रसंग येतात. असे असले तरी आजही जंगलांजवळील मानवी प्रदेशात माणसाने वन्यप्राण्यांचे सहअस्तित्व मान्य केले असून अनेक भागात प्राण्यांची काळजीही घेतली जाते
‘बीएनसीए’च्या देवकी बांदलला सव्वालाखाचा पुरस्कार पुणे : आर्किटेक्ट कै. नंदिनी सप्रे यांच्या नावाने शोध निबंधासाठी देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफआर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) देवकी बांदल हिला नुकताच मिळाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर नियोजक व आर्किटेक्ट ख्रिस्तोफर बेनिंजर
अंध विद्यार्थ्यांना ओरिगामी हस्तकला व ड्रम प्रशिक्षण पुणे : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून येत्या चार डिसेंबरला भोसरी येथील अंध विद्यार्थ्यांना ओरिगामी, हस्तकला व ड्रम वाजवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) युनिव्हर्सल डिझाइन सेंटर, तसेच डिझाइन ब्रिज फाउंडेशनतर्फे आयोजित केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language